संघाचे योगदान विचारणाऱ्यांची शिकवणी घेऊ भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे प्रतिपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघाचे योगदान विचारणाऱ्यांची शिकवणी घेऊ
भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे प्रतिपादन
संघाचे योगदान विचारणाऱ्यांची शिकवणी घेऊ भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे प्रतिपादन

संघाचे योगदान विचारणाऱ्यांची शिकवणी घेऊ भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांचे प्रतिपादन

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : ‘‘स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान काय असे प्रश्न विचारणाऱ्यांचे अज्ञान दूर करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे खास शिकवण्या घेतल्या जातील. काँग्रेसने केवळ एका कुटुंबाचा विशिष्ट इतिहास देशासमोर मांडला, इतरांचा इतिहास देशापुढे येऊ दिला नाही. त्यामुळे संघाने काय केले हे सांगण्यासाठी त्यांची शिकवणी घेऊ, अशी टीका भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली.

पुणे दौऱ्यावर आलेल्या सूर्या यांनी मॉडर्न महाविद्यालयात युवतींशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, भाजयुमोचे शहराध्यक्ष बापू मानकर, युवती आघाडीच्या शहराध्यक्षा निवेदिता एकबोटे, भाजयुमोचे राष्ट्रीय सदस्य विवेकानंद उजळंबकर आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी सूर्या म्हणाले, ‘‘कलम ३७० हटविल्यावर काश्मीरमध्ये तिरंग्याचा मान वाढला आहे. जिथे आधी तिरंग्याचा अपमान होत होता. तिथे आता मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा उत्साहात साजरा होतोय. हे मोदी आणि शहा यांच्यामुळे शक्य झाले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये सगळे एकत्र येत आहेत, पण देशाचे विघटन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती अमृत महोत्सव साजरा करत असताना राजकारण करत आहेत. देशात आजवर जाणीवपूर्वकरित्या लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, गोपाळ गणेश आगरकर यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यसेनानींचा इतिहास पुढे येऊ दिला नाही.

बदल घडविण्यासाठी राजकारणात यावेच लागेल
काही लोकांमुळे राजकारण या शब्द बदनाम झाला आहे. पण बाहेर राहून राजकारणावर टीका करण्यापेक्षा तुम्हाला देशात बदल घडवायचा असेल तर राजकारणात यावेच लागेल. तुमचे विचार, तुमची मत याला देशाच्या लोकशाहीत खूप महत्त्व आहे. त्यामुळेच मी राजकारणात आलो आहे. भारताच्या उभारणीत महिलांचे खूप मोठे योगदान आहे. देश घडविण्यासाठी पुढील २५ वर्षांचा विचार करा, तर आपण विश्‍वगुरू बनू, असे आवाहन त्यांनी मॉडर्न महाविद्यालयात आयोजित युवती मेळाव्यात केले.

भाजयुमोची तिरंगा यात्रा
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून दुचाकीवरून तिरंगा यात्रा काढली. यामध्ये खासदार तेजस्वी सूर्या स्वतः दुचाकी चालवत सहभागी झाले. जंगली महाराज रस्ता, डेक्कन, गोपाळ कृष्ण गोखले रस्ता ते मॉडर्न महाविद्यालय या मार्गे ही फेरी काढण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89909 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..