शहरात पावसाच्या हलक्या मध्यम सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरात पावसाच्या हलक्या मध्यम सरी
शहरात पावसाच्या हलक्या मध्यम सरी

शहरात पावसाच्या हलक्या मध्यम सरी

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः शहरात पावसाच्या हलक्या सरी कायम आहेत. पावसाने गेल्या दोन दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरणाची स्थिती पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्वातंत्र्य दिनाला (ता. १५) ही शहरात मध्यम पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. रविवारी (ता. १४) शहरात ढगाळ वातावरणासह मध्यम सरी तर, जिल्ह्याच्या घाट परिसरात मुसळधार ते जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

शहरात शनिवारी (ता. १३) पावसाने हजेरी लावली होती. दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते. शहरात ०.८ मिलिमीटर इतका पाऊस नोंदला गेला. शहर आणि परिसरात ही स्थिती पुढील तीन दिवस अशीच कायम राहणार असून पुणे व परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यात घाटमाथ्यावर जोर वाढणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल.
राज्यात बऱ्याच ठिकाणी कमी अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. ऊन सावल्यांच्या खेळात श्रावणसरी येत आहेत. त्यात कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार सरी कोसळत आहेत. तर रविवारी (ता. १४) सातारा, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यात शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकणात ही मुसळधार सरी कोसळल्या. ताम्हिणी येथे सर्वाधिक २१० मिलिमीटर पाऊस पडला. सध्या मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा हा दक्षिणेकडे असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. दक्षिण गुजरातपासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर येणार आहे. त्यामुळे दोन दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यात येत्या मंगळवारपर्यंत (ता. १६) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मुसळधार ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण हळूहळू कमी होण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d89925 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..