आजारांच्या प्रमाण वाढते असूनही मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजारांच्या प्रमाण वाढते असूनही 
मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता
आजारांच्या प्रमाण वाढते असूनही मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता

आजारांच्या प्रमाण वाढते असूनही मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : मानसिक आरोग्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. आजाराचे प्रमाण वाढत असले तरीही या आजारांवर उपचार करण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याची माहिती पुढे आली आहे.

आपण सर्वसाधारणपणे आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक असाच विचार करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) व्याख्येनुसार आरोग्य याचा अर्थ शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असा आहे. आधुनिक काळातील वेगवान जीवनशैलीमध्ये मानसिक आरोग्याला खूप महत्त्व आले आहे. विशेषतः कोरोनानंतर याचा प्रत्यय सर्वांना आला आहे, असे मत मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.

मानसिक आजार म्हणजे काय?
उदासीनता, व्यसनाचे आजार, चिंतेचे आजार, लैंगिक आजार, झोपेशी संबंधित विकार, मुलांमधील वर्तणुकीच्या समस्या, वृद्धांमधील मानसिक बदल या सगळ्यांचा समावेश मानसिक आजारांमध्ये होतो. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षणानुसार देशात या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण १३.७ टक्के आहे.

उपचारासाठी आवश्यक मनुष्यबळ
मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरीही त्या प्रमाणात तज्ज्ञांची संख्या वाढत नाही, हे आजचे मुख्य आव्हान आहे. मानसोपचार तज्ज्ञ, मानसोपचार शास्त्रज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, मानसोपचार परिचारिका, समुपदेशक अशा प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी फळी निर्माण करण्याची आता आवश्यकता आहे. मानसिक आजाराबद्दल गैरसमजुती खूप मोठ्या प्रमाणात असल्याने त्यासाठी जनजागृती करण्याचेही आव्हान तज्ज्ञांसमोर आता निर्माण झाले आहे.

काय केले पाहिजे?
- वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आजार व आरोग्याबद्दल अजून जास्त शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केले.
- अशिक्षितांबरोबरच सुशिक्षित लोकही मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्यात संकोच बाळगतात. आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्य व आजाराबद्दल गैरसमजुती आहेत. मानसिक आजार म्हणजे फक्त वेडेपणा ही संकल्पना बहुतांश लोकांच्या मनात असते. तो गैरसमज दूर केला पाहिजे.

मानसिक रुग्णांवर १९६० साली पहिले औषध शोधण्यात आले. त्यात आता सातत्याने सुधारणा होत आहेत. नवीन औषधांमुळे दुष्परिणाम कमी होऊन रुग्णांना उपायकारक ठरत आहेत. रुग्णाचे रोगनिदान, उपचार, काळजी, व्यवस्थापन यात प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज आहे. वेगवेगळ्या पातळीवरील उपलब्ध प्रशिक्षित मनुष्यबळामध्ये ७८ ते ९७ टक्क्यांपर्यंत तूट दिसते. हे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, प्रभारी संचालक, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था

देशातील प्रशिक्षित मनुष्यबळाची स्थिती
मनुष्यबळ ......................... आवश्यकता ...... उपलब्ध ............ तूट
मानसोपचार तज्ज्ञ .............. १७,९४० ............. ३,८२७ ........... १४,११३
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट .... १२,४२० ........... ८९८ ................ ११,५२२
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता ... २२,२५० ........ ८५० ................ २१,४००
मानसोपचार परिचारिका ............. ४८,३०० ...... १५०० ............. ४६,८००

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90106 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..