विनायक मेटे यांच्या ऋणानुबंधांना उजाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक मेटे यांच्या ऋणानुबंधांना उजाळा
विनायक मेटे यांच्या ऋणानुबंधांना उजाळा

विनायक मेटे यांच्या ऋणानुबंधांना उजाळा

sakal_logo
By

पुणे, ता. १४ : ‘‘अत्यंत गरीब परिस्थितीत जन्माला आले. राज्यभर कार्यकर्ते निर्माण केले. सलग पाच वेळा विधान परिषदेवर निवडून आले. राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. राजकारणापलीकडे जाऊन एक घनिष्ठ नाते निर्माण करून सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व होते. मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तसेच हजारो कार्यकर्त्यांचा आधार हरवला आहे,’’ अशा शब्दांत मेटे यांना पुण्यातील स्नेहींनी श्रद्धांजली वाहिली.

मेटे यांच्या अवेळी निधनाने समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी मराठा आरक्षणाचा पाठपुरावा केला. वेळप्रसंगी सभागृहही बंद पाडले. पुणे शहरावर त्यांचे विशेष प्रेम होते. २००६ साली पुण्यात त्यांच्या ४२ व्या वाढदिवसाचा अभीष्टचिंतन सोहळा साजरा केला होता. मैत्री करताना त्यांनी कधी वयाचा विचार केला नाही. आमचा आधारवड हरपला.
- तुषार काकडे, प्रदेश प्रवक्ता, शिवसंग्राम

ज्या ठिकाणी अपघात झाला, त्यापासून अलीकडे दीड किमीवर महामार्गावर आपत्कालीन काळात मदतीसाठी पोलिस मदत केंद्र आहे. तेथून पाच मिनिटांच्या आत रुग्णवाहिका येऊन तातडीचे उपचार होणे गरजेचे होते. भरमसाट टोल घेणारी आयआरबी आणि रस्ते सुरक्षा विभाग याला जबाबदार आहे. मेटे यांची कारकीर्द अखिल भारतीय मराठा महासंघामधून सुरू झाली. त्या काळात त्यांनी अनेक आंदोलनांत सहभाग घेतला होता. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- राजेंद्र कोंढरे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी विनायक मेटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. स्मारकाच्या उभारणीसाठी व मराठा आरक्षणासाठी लढणारा संघर्ष योद्धा समाजाच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहिला. अशा लढवय्या नेत्याचा अपघाती अंत होणे, हे खूप वेदनादायक आहे. त्यांनी कायम माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मार्गदर्शन व सहकार्य केले.
- विकास पासलकर, केंद्रीय निरीक्षक, संभाजी ब्रिगेड

मेटे यांनी गेल्या २० वर्षांपासून मराठा आरक्षण आणि विविध मागण्यांसाठी अनेक चळवळी आणि आंदोलने उभारली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.
- प्रा.वैभव शिळीमकर, शहराध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90132 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..