‘एमपीएसी’चे अर्ज करण्यास तांत्रिक अडचण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमपीएसी’चे अर्ज करण्यास तांत्रिक अडचण
‘एमपीएसी’चे अर्ज करण्यास तांत्रिक अडचण

‘एमपीएसी’चे अर्ज करण्यास तांत्रिक अडचण

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ उत्तीर्ण झालो आहे. गुणवत्ता यादीमध्ये नाव आले आहे. मात्र या परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्यास तांत्रिक अडचण येत आहे. अनेकवेळा प्रयत्न करूनही अर्ज स्वीकारला जात नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट आहे. त्यामुळे एमपीएससीने ही तांत्रिक अडचण दूर करावी आणि परीक्षेचा अर्ज स्वीकारण्यासाठी मदत करावी,’’ अशी मागणी विद्यार्थी रोहनने केली आहे.

महसूल व वनविभाग, कृषी, दुग्धविकास, स्थापत्य, यांत्रिकी, जलसंधारण व विद्युत विभागाच्या एकूण ५९४ जागांसाठी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ होत आहे. या परीक्षेची पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी झाली. परीक्षेचा निकाल १२ जुलै रोजी जाहीर झाला. मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २९ जुलै होती. परंतु पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नव्हता. त्यामुळे एमपीएससीने १७ ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली. आता एमपीएससीने विद्यार्थ्यांना येणारी तांत्रिक अडचण सोडवावी, असे मंदार या विद्यार्थ्यांने सांगितले.

काय आहे तांत्रिक अडचण

‘चेक ऐलिबिजिटी’ या पर्यायावर क्लिक केल्यावर ‘कॅन्डीडेट हॅज नॉट क्वीलीफायईड फॉर प्री’ असा मेसेज येत असून पुढे कोणताही परिणाम दाखवत नाही. गुणवत्ता यादीमध्ये नाव व प्रोफाइलवर गुणपत्रिका अपलोड झालेल्या विद्यार्थ्यांनाही समस्या येत आहे. हेल्पलाईनला संपर्क साधला. तसेच एमपीएससीला मेल केला आहे, मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

सरकारी सुट्यांमुळे एमपीएससीच्या कार्यालयाचे कामकाज बंद आहे. लागोपाठ सुट्या आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिसाद मिळू शकला नसेल. विद्यार्थ्यांच्यासाठी काम केले जाते. त्यामुळे अर्ज करण्यात नेमकी काय अडचण येत आहे. याची माहिती घेतली जाईल. त्यात काही आढळल्यास सुधारणा केली जाईल.
- किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, एमपीएससी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90204 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..