स्वातंत्र्य दिनी शहरात मध्यम सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्य दिनी शहरात मध्यम सरी
स्वातंत्र्य दिनी शहरात मध्यम सरी

स्वातंत्र्य दिनी शहरात मध्यम सरी

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः शहर व परिसरात पुढील दोन दिवस पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी अपेक्षित असून स्वातंत्र दिनादिवशी पुणेकरांना पावसाची अनुभूती होणार आहे. सोमवारी (ता. १५) शहरात मध्यम तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात पावसाच्या रिमझीम सरी पडल्या. शहरात ०.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. पुणे व परिसरात आठवडाभर सामान्यतः ढगाळ वातावरण कायम राहणार असून मंगळवारपर्यंत (ता. १६) हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. त्यांनतर मात्र पाऊस ओसरण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. सोमवारी (ता. १५) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. तर विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा, बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र आणि दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला असलेला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पाऊस काहीसा सक्रिय आहे. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १६) कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील.

पावसाचा ऑरेंज अलर्ट ः पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी.
पावसाचा येलो अलर्ट ः बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90218 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..