आरोग्यदायी जीवनशैली वेळीच अंगीकारावी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मत; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सहायक समितीत मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यदायी जीवनशैली वेळीच अंगीकारावी
डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मत; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सहायक समितीत मार्गदर्शन
आरोग्यदायी जीवनशैली वेळीच अंगीकारावी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मत; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सहायक समितीत मार्गदर्शन

आरोग्यदायी जीवनशैली वेळीच अंगीकारावी डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे मत; स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी सहायक समितीत मार्गदर्शन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : ‘‘लठ्ठपणा, मधुमेह यांसारख्या आजारांपासून दूर राहायचे असल्यास वेळीच आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारायला हवी. खाण्याचे नियोजन व पूरक व्यायाम असेल, तर निरोगी जीवन जगता येईल,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी केले.

विद्यार्थी सहायक समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. दीक्षित यांच्या हस्ते ध्वजवंदन व व्याख्यानाचे आयोजन केले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त निरोगी आयुष्यासाठी महिनाभर ‘जाणीव जागृती अभियान’ राबविले जाणार असून, त्याअंतर्गत होणाऱ्या ७५ व्याख्यानांपैकी पहिले व्याख्यान डॉ. दीक्षित यांनी समितीमध्ये दिले.

या प्रसंगी डॉ. दीक्षित म्हणाले, ‘‘कडाक्याची भूक लागण्याच्या दोन वेळा, आहारात कर्बोदकांपेक्षा प्रथिनांचा अधिक समावेश, भरपूर पाणी-द्रवपदार्थ खाण्यावर भर हवा. गोड पदार्थ, चहा, वेळी-अवेळी जेवण टाळावे. ५५ मिनिटांत जेवण संपवावे. किमान ४-५ किलोमीटर नियमित चालावे व व्यायाम करावा. लहान मुलांनी, गरोदर महिलांनी आवश्यकतेनुसार खावे. आपला आहार जितका चांगला, तितके आपले आरोग्य चांगले हे लक्षात ठेवावे.’’
या प्रसंगी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त संजय अमृते, तुषार रंजनकर, जिभाऊ शेवाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, माजी विद्यार्थी विजय कदम आदी उपस्थित होते. नेहा वाडेकर हिने बासरीवादनातून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा’ व ‘वंदे मातरम्’ ही गीते सादर केली. ओंकार शिंदे याने सूत्रसंचालन केले तर अंगारकी मांडे हिने आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90374 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..