शहरातील विविध संस्थामध्ये ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील विविध संस्थामध्ये ध्वजवंदन
शहरातील विविध संस्थामध्ये ध्वजवंदन

शहरातील विविध संस्थामध्ये ध्वजवंदन

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : शहरातील सेंट अन्थोनी हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला. व्यवस्थापक व प्राचार्य फादर जेम्स लूक आणि मुख्याध्यापिका इंग्रिड मॅकफारलॅन्ड यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी फेड्रीक दा गामा (निवत्त ब्रिगेडियर), टेरेजा वाज, निर्मला मकवान आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांकडून क्रांतिकारकांची वेशभूषा
आधार मूकबधिर विद्यालयातर्फे सर्व धर्माची शिकवण असा संदेश देणारी रॅली काढली. यामध्ये विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांच्या आणि नेत्यांची वेशभूषा केली होती. शाळेचे अध्यक्ष श्रीरंग उमराणी, प्राचार्या अरुणा निकम यांनी नियोजन केले.

पुणे स्टेशन परिसरात मुलांना खाऊवाटप
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेशाध्यक्ष राधिका मखामले यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. बहुजन विकास आघाडीने पुणे स्टेशन भागातील मुलांना खाऊ वाटप तसेच शाखेचे उद्‌घाटन केले. यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष सनी रायकर उपस्थित होते.

सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजवंदन
जनता दलाने (धर्मनिरपेक्ष) सफाई कामगार निर्मला पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी अशोक गायकवाड, पोलिस कर्मचारी संतोष शिंदे, शब्बीर खान नागेश पाटोळे, रोहिणी खोपडे आदी उपस्थित होते.

आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा झाला. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र खळदकर यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी मुख्याध्यापक डुंबरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

प्रियदर्शनी शिक्षण संस्थेत दादाभाई शिंगी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार, वर्षाराणी कुंभार आणि शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
साधन कन्या विद्यालयात संस्थेचे सदस्य अरविंद तुपे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी सुलोचना तुपे, अशोक तुपे, प्राचार्या सुजाता कालेकर आदी उपस्थित होते.
गणपतराव विठोबा गोळे माध्यमिक विद्यालयात (गोखले नगर) माजी नगरसेविका पद्मजा गोळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी एस. एस. पाटील, डब्ल्यू पठाण आदी उपस्थित होते.
रक्षकनगर गोल्ड सोसायटीमध्ये अनिल कुलकर्णी, महेश दहातोंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. अध्यक्ष संतोष भरणे, संजय पाटील, रोहिदास गवारी, पोपट औटी आदी उपस्थित होते. तर, हॉकर्स ॲण्ड पथारे असोसिएशन सेवा संस्थेचे अध्यक्ष युसूफ रवान यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90479 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..