स्वाध्याय परिवाराकडून श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाध्याय परिवाराकडून श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार
स्वाध्याय परिवाराकडून श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार

स्वाध्याय परिवाराकडून श्रीकृष्णाच्या विचारांचा प्रसार

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रवर्तक पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने स्वाध्याय परिवारातील युवावर्ग श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदाही आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहेत. भगवान श्रीकृष्णाची जयंती केवळ दहीहंडी फोडून न करता त्यांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने १४ हजार ५०० संघांच्या माध्यमातून पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.

स्वाध्यायाची धुरा सांभाळणाऱ्या श्रीमती  धनश्री श्रीनिवास तळवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथनाट्ये होत आहेत. देशातील २० राज्यांबरोबरच इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामधील १४ हजार ५०० संघ म्हणजे दीड ते पावणे दोन लाखांहून अधिक युवक ‘दिखावे की दुनिया’ या पथनाट्यातून सर्वांना  विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत. विविध भाषांमधून ही  पथनाट्ये १२ ऑगस्टपासून सुरू झाली असून १९ ऑगस्टपर्यंत सादर केली जाणार आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय सांभाळून युवक हे पथनाट्य सादर करत आहेत. दिखाऊ दुनियेतही ईश्वराला केंद्रस्थानी ठेवून एक निरपेक्ष, दैवी, दिखावाविरहित संबंध निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारचा  एक संदेश हे पथनाट्य देते. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेले विचार इतके प्रभावी आहेत  की ते जीवनात साकार झाल्यास व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र असा उत्तरोत्तर विकास शक्य आहे, हा संदेश पथनाट्यातून दिला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90573 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..