‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे बक्षीस वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे बक्षीस वाटप
‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे बक्षीस वाटप

‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ स्पर्धेचे बक्षीस वाटप

sakal_logo
By

पुणे, ता. १६ ः पीएमपी आणि प्रवासी यांचे नाते अधिक घट्ट होण्याच्या दृष्टीने ‘मी पीएमपीएमएलचा प्रवासी’ या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना मोफत बस पास स्वरूपात बक्षीस वाटप केले. या वेळी पीएमपीचे संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे प्रज्ञा पोतदार-पवार, सुबोध मेडसिकर आदी उपस्थिती होते. लेख, कविता, फोटो व व्हिडिओ अशा चार संवर्गात स्पर्धेचे आयोजन केले होते. या प्रत्येक संवर्गाकरिता अनुक्रमे प्रथम क्रमांकाचे बक्षीस म्हणून सर्व मार्गाकरिता १ वर्षांचा मोफत बस पास, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस सहा महिन्यांचा पास, तृतीय क्रमांकाचे बक्षीस तीन महिन्याचा मोफत बस पास असे बक्षीस जाहीर केले होते. या स्पर्धेसाठी ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने १२४० लेख, ७४० कविता, ६७७ फोटो व २८३ व्हिडिओ प्राप्त झाले होते.

उत्कृष्ट लेख
प्रथम क्रमांक -ऋषिकेश नारायण घोडके
द्वितीय क्रमांक - प्रतीक गजानन पाटील
तृतीय क्रमांक - रावसाहेब भानुदास खेडकर

उत्कृष्ट कविता
- प्रथम -यशपाल ज्ञानेश्वर पवार
- द्वितीय - आशिष सुरेश पवार
- तृतीय - वैष्णवी शिवदास भोरसे

उत्कृष्ट फोटो
प्रथम- अजय मोहन कांबळे
द्वितीय- निशा गायकवाड
तृतीय - अभिजित पांडुरंग पनाळे

ड) उत्कृष्ट व्हिडिओ

प्रथम - सुरेखा सतीश कुंजीर
द्वितीय - युवराज अशोक फडके
तृतीय - राहुल महादेव सोसे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90585 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..