‘महसूल’चे कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महसूल’चे कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत
‘महसूल’चे कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत

‘महसूल’चे कर्मचारी बदल्यांच्या प्रतिक्षेत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ : राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली असली तरी ही महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र अद्यापही बदल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. बदली आदेशांना असलेली स्थगिती आदेशाची मुदत संपून अडीच महिने होत आले, तरीदेखील नव्या सरकारने स्थगित न उठविल्यामुळे जिल्ह्यातील तलाठी, अव्वल कारकून, कारकून आणि लिपिक अशा सुमारे ६५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत.

जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या या दरवर्षी ३१ मे आत होतात, परंतु यंदा मे महिन्यात बदल्यांच्या आदेशाला राज्य सरकारकडून एक महिन्यांची स्थगिती देण्यात आली. त्यामुळे या बदल्या मुदतीत होऊ शकल्या नाही. ही मुदत ३० जूनपर्यंत होती. दरम्यानच्या कालवधीत राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडमोडी घडल्या. त्यामध्ये सत्तांतर झाल्याने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा विषय मागे पडला. आता राज्यात सरकार स्थापून होऊन दीड महिना उलटला तरीदेखील बदल्यांवर निर्णय झालेला नाही. कोरोनाच्या काळात मागील दोन वर्षात १० ते २० टक्के बदल्या झाल्या. तर काही कर्मचाऱ्यांना मुदतवाढ दिली होती. यंदा मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्याने जे बदलीस पात्र असतील, अशा सर्व कर्मचाऱ्यांची आता बदली होणार आहे. त्यामुळे शासन बदलीवरील स्थगिती केव्हा उठवते याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90635 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..