पोंक्षे यांच्यावर गुन्हा दाखल करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोंक्षे यांच्यावर गुन्हा दाखल करा
पोंक्षे यांच्यावर गुन्हा दाखल करा

पोंक्षे यांच्यावर गुन्हा दाखल करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १६ : शरद पोंक्षे हे फॅसिस्ट प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी देशाचा स्वातंत्र्य लढा, काँग्रेस पक्षाविषयची बेताल बडबड करण्यापूर्वी स्वत:ची पात्रता तपासावी. यापुढे त्यांनी वाचाळ बडबड सुरूच ठेवली, तर त्यांना योग्य ते उत्तर दिले जाईल, अशा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. पोंक्षे यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

अभिनेते पोंक्षे यांनी कॉंग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी हा इशारा दिला आहे. शिंदे म्हणाले की, केवळ सनसनाटी निर्माण करून नवीन सरकारकडून काही लाभाचे पद मिळविण्याच्या स्वार्थी हेतूने पोंक्षे यांनी अकलेचे तारे तोडलेले आहे. स्वातंत्र्य हे ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाने, बलिदानाने मिळालेले आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक धुरिणांचा वाटा देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात होता, हे ऐतिहासिक सत्य नवीन पिढीपासून लपविण्याचा दृष्ट हेतू राष्टीय स्वयंसेवक संघाच्या संस्कृतीचा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90645 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..