पुणे पुन्हा पहिल्या स्थानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे पुन्हा पहिल्या स्थानी
पुणे पुन्हा पहिल्या स्थानी

पुणे पुन्हा पहिल्या स्थानी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : राष्ट्रीय लोक अदालतीत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने पुन्हा पहिला क्रमांक पटकावला आहे. शनिवारी (ता. १६) आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण २५ हजार २१८ प्रकरणे निकाली काढली. त्यात निकाली काढलेली १४ हजार ५१४ प्रलंबित प्रकरणे ही पुण्यातील होती. इतर सर्व जिल्ह्याच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे.

कोरोना प्रादूर्भाव वाढल्याने २०२० मध्ये एक, तर २०२१ मध्ये तीन लोक आदलतींचे आयोजन केले होते. त्यानंतर यंदा २०२२ मध्ये आतापर्यंत तीन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या सहाही लोक अदालतीमध्ये पुणे जिल्ह्याने सातत्याने जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढून राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय देशमुख आणि सचिव मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकअदालतीचे आयोजन केले होते.

जास्त रकमेची नुकसान भरपाई...
येथील मोटार अपघात नुकसान भरपाई न्यायाधीकरणामध्ये प्रलंबित असलेल्या एका प्रकरणात एक कोटी ४५ लाख व दुसऱ्या एका प्रकरणात एक कोटी १० लाख रुपये एवढी नुकसान भरपाई पक्षकारांना मंजूर केली आहे. ही दोन्ही प्रकरणे पुणे येथील मोटार अपघात नुकसान भरपाई न्यायाधिकरण पुणेचे सदस्य तथा जिल्हा न्यायाधीश-१३ बी. पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयात प्रलंबित होती. या लोकन्यायालयामध्ये एकूण १४४ मोटार अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यश आले. ही प्रकरणे निकाली काढण्यात न्यायाधीश क्षीरसागर तसेच जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी विशेष प्रयत्न केले.


अमृतमहोत्सवी वर्षी ते पुन्हा एकत्र...
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर चंद्रशिला पाटील यांच्या न्यायालयात प्रलंबित असलेल्या कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल प्रकरण तडजोडीकरीता ठेवले होते. या प्रकरणातील पत्नीने वयाच्या ७५ व्या वर्षात पदार्पण केले होते व त्यांनी आपल्या पतीविरुद्ध कौटुंबिक वादाचे प्रकरण दाखल केले होते. लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांत तडजोड झाली. या प्रकरणातील पतीने पत्नीला नांदायला नेण्यास तयारी दर्शवली आहे.

आकडे दृष्टिक्षेपात...
तारीख-निकाली प्रकरणे- तडजोड रक्कम
१२-१२-२०२० - १३,५६१ - ९९,१२,१,५८०
१-८-२०२१ - ३३,०६१ - ४५,३९,८५,३२३
२५-९-२०२१ - ३१,७८३६ - १२,२७,३७,३०७
११-१२-२०२१ - २६,०४१५ - ६३,४१,७२,१६२
१२-३-२०२२ - ४६,६५९ - ९८,०७,२२,२५१
७-५-२०२२ - ३२,०९६ - १११,२७,८९,७५७
१३-८-२०२२ - २५,२१८ - ८४,५३,७,०२२
एकूण - ७,२८,८४६ - ५५५,३५,४४,००२

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90647 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..