अवतीभवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवतीभवती
अवतीभवती

अवतीभवती

sakal_logo
By

‘रामकृष्णविलोमकाव्यम्‌’
पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

पुणे : वयाची नव्वदी पार केलेल्या डॉ. वासुदेव मारुती औटी यांनी अभ्यासपूर्ण संशोधनानंतर लिहिलेल्या ‘रामकृष्णविलोमकाव्यम्‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी (ता. २१) होणार आहे.
१५ व्या शतकातील दैवज्ञश्रीसूर्यकवी यांनी रचलेले हे काव्य असून ‘रामकृष्णविलोमकाव्यम्‌’ या पुस्तकात ३६ श्लोकांचा अनुवाद केला आहे. त्याचप्रमाणे काव्याचे सविस्तर विवेचनही आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा (ता. २१) रोजी सायंकाळी ५ वाजता विठ्ठलवाडीतील कै. तु. गो. गोसावी विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधक श्रीकांत बहुळकर, पद्मगंधा प्रकाशन संस्थेचे अभिषेक जाखडे आदी उपस्थित असेल.

डॉ. चंद्रकला जोशी यांना पुरस्कार जाहीर
पुणे : डॉ. चंद्रकला जोशी (औरंगाबाद) यांना यंदाचा ‘ग्रहांकित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या रविवारी (ता.२१) पुण्यात होणाऱ्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात विश्वविख्यात लाल किताब ज्योतिष मार्गदर्शक पंडित कुंवर यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येईल. डॉ. जोशी या गेली तीस वर्षे ज्योतिष अध्यापन व ज्योतिष मार्गदर्शन करीत आहेत. नागपूरच्या कवी कालिदास विद्यापीठातून ज्योतिष विषयावर डॉक्टरेट मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ज्योतिर्विद आहेत, अशी माहिती अधिवेशनाचे मुख्य आयोजक पंडित नवीनकुमार शाह यांनी कळविली.

सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी वासवानी
पुणे ः सिंधू सेवा दलाच्या अध्यक्षपदी अशोक वासवानी, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पर्यानी, सचिवपदी सचिन तलरेजा यांची नुकतीच निवड झाली. दलाच्या खजिनदारपदी राजेंद्र फेरवानी, सहसचिवपदी किरण फेरवानी, सहखजिनदारपदी नीलेश फेरवानी तर जनसंपर्क अधिकारी म्हणून देवेंद्र चावला यांची निवड झाली. ही निवड तीन वर्षांसाठी आहे. या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉ. राम जवाहारानी उपस्थित होते. दलाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून माजी अध्यक्ष डॉ. पीटर दलवानी, मनोहर फेरवानी, सुरेश जेठवानी, दीपक वाधवानी, विजय दासवानी, जय पिंजानी व हरीश पिंजानी यांची निवड झाली. या प्रसंगी एएनपी केअर फाउंडेशनच्या सहकार्याने ‘ग्लोबल सिंधी’ या मॅट्रीमोनी ऍपचे अनावरण केले. सिंधू सेवा दलाचे संस्थापक सदस्य ईश्वर कृपलानी, उद्योजक सुनील अडवानी, घनश्याम सुखवानी आदी उपस्थित होते.

जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
पुणे ः स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून पुणे शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या शुक्रवार पेठ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रसंगी प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, तसेच उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश बागवे, बाळासाहेब अमराळे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90721 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..