अवती भवती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवती भवती
अवती भवती

अवती भवती

sakal_logo
By

क्षत्रिय समाज ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांचे गुणगौरव

पुणे ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट आणि युवक संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील वालवेकर व प्रमुख पाहुणे अक्षय वखारे, गौरी भांडगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात WWW.SSKYUVAKSANGHATANA.COM या संकेतस्थळाचे लोकार्पण केले. एका विद्यार्थ्यास आणि एका विद्यार्थिनीला लकी ड्रॉद्वारे सायकल भेट दिली. पुणे समाजाचे सल्लागार बाळासाहेब पवार, श्रीकांत शालगर, पुणे ट्रस्टचे अध्यक्ष मनोज गुरूनाथ, आदी उपस्थित होते.
--------
विजय वल्लभ शाळेतर्फे स्वातंत्र्यदिन सोहळा
पुणे ः आचार्य श्री. विजय वल्लभ स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. भारतीय नौदल अकादमी एझिमला केरळचे माजी प्राचार्य ऍडमिरल अमित विक्रम, मिलिटरी पोलिस सदन कमांडचे माजी कमांडिंग ऑफिसर कर्नल गुरुचरण सिंग कोहली आणि उद्योगपती मोहनलालजी ताराचंदजी संघवी हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष परमार, सचिव पुखराज संघवी, खजिनदार सुरेश परमार, मुख्याध्यापिका जसिन्ता मॅन्युएल, स्नेहल खटावकर, मानसी मारुलकर या उपस्थित होत्या. लॅबचे उदघाटन संघवी यांच्या हस्ते केले.
---------------------
नूमवीत ध्वजवंदन
पुणे ः स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नूमवि शाळेत स्वातंत्र्य दिनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. शाला समितीचे अध्यक्ष माननीय पराग ठाकूर साहेब यांनी ध्वजवंदन केले. यावेळी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका विद्या सोनवणे व शिशू शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख प्राजक्ता पारेकर व ज्योती अजमेरा यांनी केले. नितीन शेंडे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90755 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..