गेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन
गेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

गेनबा सोपानराव मोझे शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. त्या अंतर्गत महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक व उच्चमाध्यमिक प्रशालेत ‘सामूहिक राष्ट्रगीत’ गायन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जालिंदर भागवत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुधीर शिंगटे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण यादव, पर्यवेक्षक मारुती दसगुडे, संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मोझे, शालेय समिती अध्यक्ष अलका पाटील आदी उपस्थित होते.

डीईएसच्या ३५०० विद्यार्थ्यांचे सामूहिक राष्ट्रगीत
पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ३५०० विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय, डीईएस इंग्लिश मीडियम स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. डीईएसच्या नियामक मंडळाच्या सहकार्यवाह प्रा. प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका ज्योती बोधे, लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90781 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..