नॅनो युरियाचा नवीन आविष्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नॅनो युरियाचा नवीन आविष्कार
नॅनो युरियाचा नवीन आविष्कार

नॅनो युरियाचा नवीन आविष्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात नॅनो युरिया नवीन आविष्कार ठरणार आहे. नॅनो युरिया हे एक द्रवरूप नत्रयुक्त खत असून त्यामध्ये चार टक्के टक्के नत्र नॅनो कणांच्या स्वरूपात असतो. त्यामधील नॅनो नत्र कणांचा आकार हा ३० ते ५० नॅनोमीटर इतका
असतो. जे पिकांच्या वाढीसाठी व विकासासाठी आवश्यक असणारे नत्र ही मुख्य अन्नद्रव्ये पुरवते.
नॅनो युरिया हे इफकोच्या कलोल, गुजरात येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन केंद्र येथे स्वदेशी तंत्रज्ञानने विकसित केला आहे. आपल्या देशातील ९७ वेगवेगळ्या पिकांवरती २० वेगवेगळ्या कृषी विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनावरून नॅनो युरियाच्या वापराद्वारे पारंपारिक युरियाचा ५० टक्क्यांपर्यंत वापर कमी करून आपण चांगले पीक घेवू शकतो, अशी माहिती इफकोचे वरिष्ठ विपणन व्यवस्थापक डॉ. एम. एस .पोवार यांनी दिली.

नॅनो युरियाची वैशिष्ट्ये
नॅनो युरियामध्ये नत्राचे कण हे अतिसूक्ष्म असल्यामुळे ते एकसंघ असतात तसेच त्यांचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ हे पारंपारिक युरिया पेक्षा १० हजार पट जास्त असल्यामुळे त्याची कार्यक्षमता ९० टक्‍क्‍यांपर्यंत असते. जी पारंपारिक युरियामध्ये ३० ते ५० टक्के असते.

नॅनो युरियाचे फायदे
- नॅनो युरियाच्या वापरामुळे पिकांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते
- पीक उत्पादन खर्चात बचत होते
- पिकांची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते
- नॅनो युरियाच्या वापरामुळे हवा पाणी आणि जमीन यांची हानी थांबते

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90815 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..