नाईकनवरे डेव्हलपर्सचे तळेगावात ‘कुटुंब’ थीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाईकनवरे डेव्हलपर्सचे तळेगावात ‘कुटुंब’ थीम
नाईकनवरे डेव्हलपर्सचे तळेगावात ‘कुटुंब’ थीम

नाईकनवरे डेव्हलपर्सचे तळेगावात ‘कुटुंब’ थीम

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : नव्या पिढ्यांना भारतीय संयुक्त कुटुंब पद्धतीची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘नाईकनवरे डेव्हलपर्स’तर्फे बंगळूर येथील ‘प्राइमस’ कंपनीच्या सहकार्याने ‘कुटुंब’ हा विविध पिढ्यांना एकत्र आणणारा थीम आधारित समुदाय प्रकल्प निर्माण केला जात आहे. या प्रकल्पाच्या घोषणेच्या निमित्ताने विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, ‘नाईकनवरे डेव्हलपर्स’ संचालक हेमंत नाईकनवरे, ‘एएसके रियल्टी’चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील रोहोकले, ‘प्राइमस’चे व्यवस्थापकीय संचालक आदर्श नरहरी, ‘सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’च्या आंतरराष्ट्रीय प्रवेश आणि आंतरराष्ट्रीय प्रचार विभागाच्या प्रमुख अमृता रुईकर हे या चर्चासत्रात सहभागी झाले होते. तळेगावमध्ये सोळा एकरांवर पसरलेल्या या प्रकल्पात रो हाऊस, टाउनहाऊस, डुप्लेक्स, अपार्टमेंट आणि एनए पूर्णत: सर्व्हिस केलेले प्लॉट्स यांसारखे अनेक गृहनिर्माण पर्याय सर्व सुविधांसह उपलब्ध आहेत. येथे घर खरेदी करणाऱ्यांना २४ तास वैद्यकीय सुविधा, मुलांसाठी एक डे-केअर सेंटर, कुटुंबांसाठी उपक्रम व सेवा, टेलिमेडिसीन सुविधा, पौष्टिक जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज इन-हाउस रेस्टॉरंट्स, आदी सेवांचा लाभ घेता येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90820 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..