COVID-19 Vaccine : ‘नोव्हॅक्सोव्डिड’ सर्व व्हेरियंटवर भारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Novavax vaccine
‘नोव्हॅक्सोव्डिड’ सर्व व्हेरियंटवर भारी

COVID-19 Vaccine : ‘नोव्हॅक्सोव्डिड’ सर्व व्हेरियंटवर भारी

पुणे : नोव्हाव्हॅक्सच्या नोव्हॅक्सोव्हिड ही लस कोरोनाच्या आतापर्यंतच्या सर्व व्हेरियंटवर रामबाण ठरत असल्याची माहिती बुधवारी देण्यात आली. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनालयाने (एफडीए) अलीकडेच नोव्हाव्हॅक्सच्या नोव्हॅक्सोव्हिडला मान्यता दिल्याने ते अमेरिकेतील लस बाजारपेठेत प्रवेश मिळविणारे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पहिले भारतीय उत्पादन ठरले आहेत. पुण्यात निर्मित या लसीचे सुमारे ३५ लाख डोस अमेरिकेत पाठविण्यात आले आहेत.

महासाथीदरम्यान जगाशी भारताने केलेली भागीदारी व निर्धार यांचा सन्मान करण्याच्या निमित्ताने भारत आणि अमेरिका या दोन देशांमधील दीर्घकालीन संबंधांचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. भारतीय बनावटीची लस प्रथमच अमेरिकेतील नागरिकांनी दिली जाणार. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नोव्हॅक्सोव्हिडला या अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली. त्यामुळे अमेरिकेतील बाजारपेठेत प्रवेश मिळालेले हे पहिले उत्पादन ठरले आहे. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि नोव्होव्हॅक्सच्या वतीने ही लस बनवण्यात आली आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच पूर्णपणे भारतात तयार झालेली लस अमेरिकेत वितरित होणार आहे, असेही येथे स्पष्ट करण्यात आले.

महत्त्वाचे टप्पे
- नोव्हॅसोव्हीड ही लस कोरोनाच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारचे व्हेरियंटवर उपयुक्त
- नोव्हाव्हॅक्सच्या लसीचा विकास व उत्पादन यासाठी सिरम आणि नोव्हाव्हॅक्स महत्त्वपूर्ण भागीदार
- लसीचे नोव्हाव्हॅक्सकडून नोव्हॅक्सोव्हिड या नावाने तर सिरमतर्फे कोव्हाव्हॅक्स या नावाने वितरण
- हे उत्पादन पुण्यात करण्यात आले आहे
- युरोप, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेसारख्या नियंत्रित बाजारपेठांसह जगातील अनेक देशांमध्ये लस निर्यात

सिरम आणि नोव्हाव्हॅक्स यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये लशीच्या विकासाचे मोठे टप्पे गाठले आहे. लस तयार करण्यासाठी अत्यावश्यक कच्चा माल, तंत्रज्ञान अशी आव्हाने असूनही हे यश मिळविले. प्रथमच भारतीय लस अमेरिकेत पोचत आहे. यातून भविष्यातील भागीदारीची दारे खुली झाली आहेत. या दोन्ही संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून भविष्यात हिवताप, फ्ल्यू या आजारावरील लशी विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी दिलेल्या पाठिंब्याने हे यश मिळाले आहे.
- आदर पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90862 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..