देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Reporter
नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा

पुणे - पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जणारा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने विजय बाविस्कर (लोकमत), अभिजित अत्रे (टाइम्स ऑफ इंडिया) आणि वैशाली बालाजीवाले (देशदूत) यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तर आश्वासक पत्रकार पुरस्काराने ‘सकाळ’ पुणेच्या कार्यकारी संपादक शीतल पवार यांना गौरविण्यात येणार आहे.

शनिवारी (ता. २०) सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्व संवाद केंद्र आणि सोसायटीच्या वतीने दरवर्षी हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे हा पुरस्कार कार्यक्रम न झाल्यामुळे २०२०, २०२१ आणि २०२२ या तीन वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार आहेत. आश्वासक पुरस्कारांमध्ये अश्विनी टेंबे (केसरी), सुनील लांडगे (महाराष्ट्र टाइम्स) यांची आश्वासक पत्रकार पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सांगलीचे आदित्य वेल्हाळ आणि रूख्मांगद पोतदार (टाइम्स नाऊ वाहिनी) यांना छायाचित्रकार तसेच पुण्याचे घनश्याम देशमुख यांना व्यंगचित्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सोशल मीडिया पुरस्कारांसाठी नाशिक येथील द ‘फोकस इंडिया’चे संपादक विनायक ढेरे, पुण्यातील अमित परांजपे आणि सांगली येथील विनिता तेलंग या सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची निवड झाली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90871 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneawardJournalism