खाद्य पदार्थ पॅकिंग करताना स्टेपलर पिन मारण्यास बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्य पदार्थ पॅकिंग करताना स्टेपलर पिन मारण्यास बंदी
खाद्य पदार्थ पॅकिंग करताना स्टेपलर पिन मारण्यास बंदी

खाद्य पदार्थ पॅकिंग करताना स्टेपलर पिन मारण्यास बंदी

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : खाद्य पदार्थ पार्सल करून घेताना विक्रेत्यांनी प्लॅस्टिक किंवा पेपर बॅगला स्टेपलर पिन किंवा चिकटपट्टी लावलेली नाही ना, याची खात्री करा. कारण, या पुढे खाद्य पदार्थाचे पॅकिंग करताना याचा वापर न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. अन्न पदार्थ पार्सलसाठी प्लॅस्टिकचे डबे वापरण्याची सूचनाही केली आहे.
खाद्यपदार्थाचे पॅकिंग करताना स्टेपलर पिन किंवा चिकटपट्टी याचा वापर आता करता येणार नाही. त्याबाबतचे आदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागाने बुधवारी दिले. हॉटेल किंवा कोणत्याही ठिकाणावरून अन्न पदार्थ पार्सल करण्यासाठी कागदाची किंवा प्लॅस्टिकची पिशवी वापरली जाते. त्याला स्टेपलर पिन किंवा चिकटपट्टी लावून ते ग्राहकांना घेऊन जाता येईल. याची काळजी खाद्य पदार्थ विक्रेता घेत असतो. पण, आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय खाद्य सुरक्षा मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) या बाबतचा आदेश दिला आहे. त्या आधारावर ‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी हे आदेश काढले आहेत.

केंद्र सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व अन्न व्यावसायिकांनी खाद्य पदार्थ पेपरबॅग किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये ग्राहकांना पार्सल देताना त्याला स्टेपलर पिन किंवा चिकटपट्टी याचा वापर करू नये. त्यातून ग्राहकांच्या जिवास धोका पोचू नये, तसेच त्यातून मानवी आरोग्यास बाधा होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी हा आदेश दिला आहे. त्यामुळे आता प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर करावा.
- संजय नारागुडे, सहआयुक्त, ‘एफडीए’च्या पुणे विभाग

.........

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90892 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..