मेटे यांच्या भाच्याचा चालकावर संशय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेटे यांच्या भाच्याचा चालकावर संशय
मेटे यांच्या भाच्याचा चालकावर संशय

मेटे यांच्या भाच्याचा चालकावर संशय

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक सातत्याने त्याचे जबाब बदलत आहे. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढत आहे. तसेच त्या दिवसी गाडी वेगाने चालवली असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा घात की अपघात याची माहिती समजली पाहिजे. तसेच मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या आठ सदस्यीय समितीचा अहवाल लवकर जाहीर करावा, अशी मागणी मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

चव्हाण म्हणाले, ‘‘ या दुःखातून आम्ही सावरलो नाही. मात्र तीन दिवसानंतर आम्ही पत्रकारांसमोर यायचे ठरवले. गाडीचा चालक एकनाथ कदम हा सातत्याने जबाब बदलत आहे. त्यामुळे त्याच्यावर आमचा संशय आहे. मी त्याला त्यांचे लोकेशन विचारले तर ‘तुम्ही कोण बोलताय’ असा प्रश्न विचारत होता. गेल्या बारा वर्षांपासून काम करणारा असे कसे विचारू शकतो? त्याला लोकेशन सांग असे सातत्याने विचारत होतो, पण तो नुसता रडत होता. तिथे असणाऱ्या एका तिऱ्हाईत व्यक्तीला त्याने फोन दिला. त्यांनी सांगितले की, रुग्णवाहिका आली आहे. चालकाला काही झाले नाही, मात्र पोलिस जखमी झाले आहेत. परंतु साहेब जागेवर गेले आहेत.’’ टोल नाक्यापासून २० ते २५ किलोमीटर अंतरावर झोप लागू शकत नाही. टोल नाक्याच्या सीसीटिव्हीमध्ये साहेब कुठेच दिसत नाहीत. चालक सतत कोणाला तरी फोन करत होता, असे चव्हाण यांनी सांगून चालकाच्या फोनची तपासणी करण्याची मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90912 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..