आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल : डॉ माधुरी कानिटकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल : डॉ माधुरी कानिटकर
आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल : डॉ माधुरी कानिटकर

आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल : डॉ माधुरी कानिटकर

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : “पुराव्यावर आधारित संशोधनामुळे आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल,” असा विश्वास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी व्यक्त केला.
“आयुर्वेदाला भारतीय मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवा म्हणून परत आणणे ही आयुर्वेदाच्या शिक्षकांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी हे शिक्षक उत्तम प्रकारे पार पाडत आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
आयुर्वेद टीचर्स असोसिएशनद्वारे आयोजित राष्ट्रीय आयुर्वेद परिषदेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. कानिटकर बोलत होत्या. ‘पुराव्याधारित आयुर्वेद’ ही यंदाच्या परिषदेची संकल्पना होती. आयुर्वेद शिक्षणातील उल्लेखनीय कार्यासाठी गुजरात येथील आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीराम सावरीकर आणि अमरावती विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉ. पुरुषोत्तम पाळेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतभरातील आयुर्वेद शिक्षकांना संबंधित विषयातील राष्ट्रीय उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ सुनंदा आणि सुभाष रानडे यांना ग्लोबल आयुर्वेद अॅम्बेसेडर पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयंत आसगावकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. मिलिंद निकुंभ, आयुर्वेद टीचर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, डॉ.नितीन वाघमारे, उपस्थित होते.
डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘‘पुराव्यावर आधारित संशोधनामुळे आयुर्वेदास जागतिक पातळीवर मान्यता मिळेल आणि जगभरातील सर्व देशांमध्ये आयुर्वेदास लोकाश्रय मिळेल.” या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. मनोज चौधरी यांनी केले.

पुण्यात हवी संशोधन संस्था

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, “आम्ही सरकारला पुण्यात राष्ट्रीय आर्युर्वेद संशोधनसंस्था स्थापन करण्याची विनंती करतो, जेणेकरून पुणे व जवळच्या परिसरातील लोकांना आयुर्वेदात संशोधन करत असताना मार्गदर्शन मिळेल. तसेच लोकांना आयुर्वेद उपचाराचा लाभ मिळेल.”

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90915 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..