राष्ट्रगीतासाठी पुणे शहर ‘सावधान’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रगीतासाठी पुणे शहर ‘सावधान’
राष्ट्रगीतासाठी पुणे शहर ‘सावधान’

राष्ट्रगीतासाठी पुणे शहर ‘सावधान’

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, एवढंच काय तर खासगी आस्थापनांमध्येही बुधवारी सकाळी ११ च्या ठोक्याला राष्ट्रगीतासाठी संपूर्ण शहर ‘सावधान’ झाले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित स्वराज्य महोत्सवात पुणेकरांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रगीताचे समूह गायन केले.

बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या शिवाजीनगर येथील लोकमंगल मुख्यालयात सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राष्ट्रगीताचे गायन केले. यावेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार व आशिष पांडे उपस्थित होते. तिरंगा रॅली, ध्वज वाटप आदी उपक्रम बॅंकेकडून राबविण्यात आले. महापालिका मुख्य भवनातील हिरवळीवर आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गायले. त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य कोठी या ठिकाणीही महापालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते.

विद्यापीठात समूह गायन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. राष्ट्रप्रेमाची भावना सर्वांमध्ये रुजावी यासाठी राष्ट्रगीत गायनाबाबतचा कार्यक्रम आखला होता. विद्यापीठाच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर विभागांमध्ये त्या त्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी एकत्र येत राष्ट्रगीत गायले. विद्यापीठात कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनीही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत समूह राष्ट्रगीत गायन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90933 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..