तपासणी न करताच सर्टिफिकेटवर नियंत्रण आणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तपासणी न करताच सर्टिफिकेटवर नियंत्रण आणा
तपासणी न करताच सर्टिफिकेटवर नियंत्रण आणा

तपासणी न करताच सर्टिफिकेटवर नियंत्रण आणा

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः केंद्र सरकारच्या धोरणानुसार ऑनलाइन फॉर्म नंबर वन ए मेडिकल सर्टिफिकेट देताना अर्जदारांची तपासणी होणे अपेक्षित आहे. परंतु, राज्यात अर्जदाराची शारीरिक व डोळ्यांची तपासणी न करता सर्टिफिकेट दिले जात आहे. त्यामुळे हा प्रकार थांबवावा, अशी मागणी परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनने केली आहे.
अर्जदार एका ठिकाणी असतो, त्याचा फॉर्म वन ए मेडिकल सर्टिफिकेटचा अर्ज दुसरीकडे पाठवून डॉक्टरांकडून दुसऱ्या ठिकाणावरून कोणतीही तपासणी न करता सही व शिक्का मारून मेडिकल सर्टिफिकेट देण्यात येते, असे आढळून आले आहे. परिवहन कार्यालयात ओळखीच्या डॉक्टरांना पॅनेलवर घेऊन अर्जदाराकडून १०० ते २०० रुपये घेऊन त्यातील काही रक्कम संबंधित अधिकाऱ्यांना संगनमताने देण्यात येते, असा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90953 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..