गणेशोत्सवानंतर होणार उड्डाणपुलाचे काम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवानंतर होणार उड्डाणपुलाचे काम
गणेशोत्सवानंतर होणार उड्डाणपुलाचे काम

गणेशोत्सवानंतर होणार उड्डाणपुलाचे काम

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः गणेशखिंड रस्त्यावर आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) उड्डाणपुलाचे काम गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू केले जाईल. त्यापूर्वी याठिकाणची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन केले जाणार आहे. दरम्यान, गणेशखिंड रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने नागरिक वैतागलेले असताना एका दिवसात सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश पथ विभागाला दिले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम करतानाच विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी येथे उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. गणेशखिंड रस्त्यावर विद्यापीठ चौकात काम सुरू नसले तरी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच परत खड्डे पडल्याने वाहतुकीची गती आणखी मंदावली आहे. असे असताना एकाच वेळी विद्यापीठ चौकात मेट्रो व उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका, पीएमआरडीए, वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

विद्यापीठ चौकात एकाचवेळी उड्डाणपूल आणि शिवाजीनगर-औंध भुयारी मार्ग ही दोन्ही कामे एकाच वेळी करता येणार का? याबाबत प्रशासन साशंक आहे. जर हे काम सुरू केले तर या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवाजीनगर-हिंजवडी हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करायचा असल्याने या चौकातील कामेही वेळेतच पूर्ण करावी लागणार असल्याने त्याचे नियोजन करणे आवश्‍यक ठरणार आहे. यासंदर्भात महापालिका व पीएमआरडीएच्या बैठका होणार आहेत.


‘‘पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे काम गणेशोत्सवानंतरच सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. या रस्‍त्यावर पडलेले खड्डे एका दिवसात बुजवून घेण्याचे आदेश पथ विभागाला दिले आहेत. तसेच मेट्रोचे काम करताना रस्त्याच्या मध्यभागी ७ मीटर पेक्षा जास्त बॅरिकेडींग करता येणार नाही, जेथे जास्त जागा व्यापली आहे तेथील रस्ता मोकळा करण्याचे पीएमआरडीएला दिले आदेश दिले आहेत.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका


असा आहे प्रकल्प
- दुमजली उड्डाणपूल - २६८ कोटी,
- शिवाजीनगर-औंध भुयारी मार्ग - ६८ कोटी
- बाणेर, पाषाणसाठी दोन मार्गिका -२५ कोटी
- हरे कृष्ण मंदिर भुयारी मार्ग -१५ कोटी
- वेधशाळा चौक भुयारी मार्ग - १० कोटी
- अभिमानश्री चौक भुयारी मार्ग- ४० कोटी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90982 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..