राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार
राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार

राकेश सणस यांना बाबा आमटे पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : बाबा आमटे यांनी ज्यावेळी समाजकार्याचे विविध प्रयोग राबविले तेव्हा समाजमाध्यमांचा उगम झालेला नव्हता. आमटे कुटुंबीय ज्या भागात काम करीत आहेत तो भाग आजही अतिशय दुर्गम आहे. आता समाज माध्यमांच्या उपलब्धतेमुळे बाबा आणि प्रकाश आमटे यांनी सुरू केलेल्या कामांचा विस्तार करणे आमटे कुटुंबीयांच्या आमच्या पिढीतील लोकांना तुलनेने सोपे होत आहे, असे मत हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे यांनी व्यक्त केले.
इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशन या नावीन्यपूर्ण सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त संस्थेतर्फे दरवर्षी उदयोन्मुख सामाजिक संस्थेला देण्यात येणारा प्रेरणास्थान थोर समाजसेवक बाबा आमटे पुरस्कार यंदा विशेष मुलांसाठी काम करणाऱ्या कोथरूड येथील उमेद फाउंडेशनचे संस्थापक राकेश सणस यांना देण्यात आला, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून अनिकेत आमटे बोलत होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजीत सोनावणे, इन्स्पायर ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश चाफेकर आदी उपस्थित होते. रोख रुपये ५०,००० आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रास्ताविकात इन्स्पायरर्स ट्राइब प्रकाशवाटा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश चाफेकर यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. दीपा सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले.
85186

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90995 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..