यिनच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर
यिनच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

यिनच्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर

sakal_logo
By

(यिनचा लोगो वापरावा)

पुणे, ता. १७ ः यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क अर्थात यिनच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्‍त शुक्रवारी (ता.१९) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन तरुणाईचे हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या यिनचा वर्धापन दिन बुधवार पेठेतील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयात पार पडणार आहे.

रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, सामाजिक भान जपत वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे यिनच्य वतीने सांगण्यात आले आहे. सकाळी साडेनऊ ते अडीच या वेळेत हे शिबिर पार पडणार असून, रक्तदात्यास प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त महाविद्यालयांनी, नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी ९८८१५०४४९२ किंवा ८८०५५१८४३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91005 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..