पुण्यातील १७ रस्ते खराब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील १७ रस्ते खराब
पुण्यातील १७ रस्ते खराब

पुण्यातील १७ रस्ते खराब

sakal_logo
By

पुणे, ता. १७ ः रस्त्यांना खड्डे पडल्याचा अहवाल प्राप्त होऊन जवळपास २० दिवस उलटून गेले तरी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचा मुहूर्त महापालिकेला अद्याप मिळालेला नाही. दरम्यान, १३९ पैकी केवळ १७ रस्तेच खराब झाल्याचा अहवाल त्रयस्थ संस्थेने दिला आहे. त्यातही ८ रस्त्यांना इतर विभागांनी केलेल्या खोदकामामुळे खड्डे पडले आहेत. तर ९ रस्ते हे दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड- डीएलपी) असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पुणेकर त्रस्त झाले. मोठ्या रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्त्यांची चाळण झाली. नागरिकांनी टीका सुरू केल्यानंतर महापालिकेने खड्डे दुरुस्ती सुरू केली. साडेआठ हजार खड्डे बुजवून देखील शहरात अद्यापही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. गेल्या काही दिवसांपासून खड्डे बुजविण्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांनी मुख्य पथ खात्याकडील १३९ डीएलपी मधील रस्त्यांची पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड या त्रयस्थ संस्थेला नियुक्त केले होते. या संस्थेने शहरातील १३८ रस्त्यांची पाहणी करून २९ जुलै २०२२ रोजी अहवाल सादर केला आहे.
त्यामध्ये १७ रस्त्यांवर खड्डे पडल्याचे निदर्शनास आले. यापैकी तीन ठेकेदारांवर यापूर्वीच कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. मात्र, त्यानंतर कारवाई करण्यात आलेली नाही.

इतर विभागांचेही दुर्लक्ष

तपासणी केलेल्या १७ पैकी ८ रस्ते पाणी पुरवठा, मलःनिसारण या विभागाकडून खोदण्यात आले होते. हे रस्ते निकृष्ट पद्धतीने बुजविण्यात आल्याने खड्डे पडले आहेत, पण या विभागांनाही ही यादी देण्यात आली नाही व त्यांच्याकडूनही ठेकेदारांवर कारवाई झालेली नाही.

रस्त्याचे नावे - ठेकेदार- खड्डे पडण्याचे कारण
श्रीकंट्रोल चौक ते काळूबाई मंदिर - दीपक कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम
पंचमी हॉटेल ते राजीव गांधी इ लर्निंग स्कूल - धनराज असफाल्ट- निकृष्ट काम
अहिल्यादेवी चौक ते तीन हत्ती चौक - धनराज असफाल्ट - निकृष्ट काम
नॅन्सी लेक होम्स ते पद्मजा पार्क रस्ता - एस. एस. कंस्ट्रक्शन- निकृष्ट काम
केदारी पेट्रोल पंप - श्री योगेश कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम
लाल महाल चौक ते फडके हौद - शुभम कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम
शिवाजी रस्ता - देवकर अर्थमुव्हर्स - निकृष्ट काम
लोहियानगर, कासेवाडी रस्ता - विनोद मुठा- इतर विभागाकडून खोदकाम
महंमदवाडी रस्ता ते मारगोसा सोसायटी - गणेश एंटरप्रायझेस - इतर विभागाकडून खोदकाम
राजीव गांधी नगर वीर वस्ती - श्री योगेश कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम
ताडीगुत्ता चौक ते सीसी रस्ता - सनशाईन कंस्ट्रक्शन -इतर विभागाकडून खोदकाम
संगमवाडी ते टिंगरेनगर रस्ता - यू. आर. फॅसिलिटी - निकृष्ट काम
उत्तरेश्‍वर रस्ता लोहगाव - श्रेयस कंस्ट्रक्शन - निकृष्ट काम
बावधन मुख्य रस्ता - आदर्श भारत एनव्हॅरो प्रा. लि.- इतर विभागाकडून खोदकाम
गणेशखिंड रस्ता ते धोत्रे पथ - पावेवय कन्स्ट्रक्शन- इतर विभागाकडून खोदकाम
हरेकृष्ण पथ - पावेवय कन्स्ट्रक्शन- निकृष्ट काम
क्रीडासंकुल ते म्हाळुंगे गावठाण रस्ता - शुभम कंस्ट्रक्शन - इतर विभागाकडून खोदकाम

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91015 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..