विद्येच्या प्रांगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्येच्या प्रांगणात
विद्येच्या प्रांगणात

विद्येच्या प्रांगणात

sakal_logo
By

हुजूरपागा शाळेत दहीहंडीचा उत्साह
पुणे, ता. २० : हुजूरपागा इंग्रजी माध्यमाच्या कात्रज विभागात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व विद्यार्थिनी राधाकृष्ण, गोपिकांच्या पोशाखात आल्या होत्या. यावेळी विद्यार्थिनींनी कृष्णाच्या बाललीला, त्याचे सवंगडी, कालियामर्दन, माखनचोर, गोप-गोपिका अशा कृष्णलीला नृत्याच्या माध्यमातून सादर केल्या. यानंतर गोविंदा झालेल्या विद्यार्थिनींनी एकावर एक थर चढवून दहीहंडी फोडली. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अर्पिता कुलकर्णी व कीर्ती पंडित यांनी मार्गदर्शन केले.
---------------------
एनईएमएस पूर्व-प्राथमिकमध्ये ‘पौष्टिक आहाराची हंडी’
पुणे, ता. २० : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एनईएमएस पूर्व-प्राथमिक शाळेत ‘पौष्टिक आहाराची हंडी’ साजरी केली. यानिमित्त विद्यार्थ्यांना पौष्टिक अन्नाचे महत्त्व सांगण्यात आले. जन्माष्टमीनिमित्त गोकूळ नगरीचा देखावा सादर केला. देखाव्यात बाळकृष्ण, दही-लोण्याची हंडी, गाई-गुरांचा गोठा, उखळ, बैलगाडी आदींचा समावेश होता. राधा-कृष्ण आणि गोकुळवासियांच्या वेशभूषेत विद्यार्थी आले होते. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका सुचेता वझे आणि अपर्णा हेंद्रे यांनी संयोजन केले.
-----------------------
अभिनव स्कूलमध्ये ‘पुस्तक हंडी’
पुणे, ता. २० : आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. यावेळी पुस्तक हंडीतील पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप केले. या उपक्रमासाठी प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि शिक्षकांनी मार्गदर्शन केले.