महावितरणच्या ‘मीटर रीडिंग’ मोहिमेला यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या ‘मीटर रीडिंग’ मोहिमेला यश
महावितरणच्या ‘मीटर रीडिंग’ मोहिमेला यश

महावितरणच्या ‘मीटर रीडिंग’ मोहिमेला यश

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ : मीटर रिडींगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सी चालकांवर कारवाईचा बडगा उगारताच अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महावितरणला यश आले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक त्रास व महावितरणच्या महसुलाचे नुकसान लक्षात घेऊन सुरू केलेल्या या मोहिमेला यश आले आहे. एप्रिल ते जून २०२२ दरम्यान वीज विक्रीतही तब्बल ३ (८२५ द.ल.यु.) टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा शेरा देणे, चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध महावितरणने मोहीम सुरू केली आहे. तसेच अशा एजन्सींकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष विजय सिंघल यांनी घेतला होता. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

...तर एजन्सींवर कारवाई!
ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे, परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे बिलींगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणने ध्येय निश्‍चित केले होते. त्यासाठी सुरू असलेल्या उपायांमुळे बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका टाळल्या नाही तर एजन्सींविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली आहे, असे महावितरणने कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91577 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..