‘लाईन बॉय’ बनले व्यावसायिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लाईन बॉय’ बनले व्यावसायिक
‘लाईन बॉय’ बनले व्यावसायिक

‘लाईन बॉय’ बनले व्यावसायिक

sakal_logo
By

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १९ ः ‘लाईन बॉय’ म्हंटले की पोलिसांच्या मुलांबद्दल नकारात्मक प्रतिमा चित्रपट, मालिकांद्वारे दाखविण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे होत आहे. त्यातही पोलिसांच्या मुलांचा नोकरीसाठी पोलिस भरती किंवा ‘एमपीएससी’ची तयारी करण्यात जास्त कल असल्याचे चित्र होते. मात्र, हे चित्र बदलले असून आता पोलिसांची मुले हॉटेल, कॅफे, कपडे विक्री अशा व्यवसायात आपला जम बसवित असल्याचे समाधानकारक चित्र आहे. ‘लाईन बॉय’ने नोकरी करण्यापेक्षा व्यवसायाला सुरू करुन हजारो बेरोजगारांच्या हातांना काम देणे सुरू केले आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय जामदार यांचा मुलगा विकास जामदार याने सध्या हॉटेल व कपडे विक्रीच्या व्यवसायात स्वतःचा चांगलाच जम बसविला आहे. विकासने भागीदारांसमवेत कपड्याचे दुकान, हॉटेल व कॅफे सुरू केला आहे. त्याविषयी विकास सांगतो, ‘‘माझे वडील संजय जामदार हे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आहेत. मी ‘एमपीएससी’ची तयारी केली, मात्र यश न आल्याने व्यवसायात उतरलो. खानावळीनंतर कपडे विक्रीचे दुकान सुरू केले. त्यानंतर हळूहळू टिळक रस्त्यावर एक, कात्रज चौकात एक हॉटेल सुरू केले. १५ ते १६ मुलांना मी रोजगार देत आहे.''''

हॉटेल व्यवसायात जम बसविलेल्या स्वप्नील वैद्य याने आपला अनुभव मांडला. ‘‘माझ्या तीन पिढ्या पोलिस दलात आहेत. मी तीन वर्षांचा असतानाच वडील गेले, त्यानंतर आई सुवर्णा वैद्य या पोलिस झाल्या. मित्रामुळे व्यवसायात उतरलो. कपड्याचे दुकान कोरोनामध्ये बंद पडले. त्यातील भांडवलातूनच बाणेरला हॉटेल सुरू केले. आता माझी तीन-चार हॉटेल्स आहेत. तेथे १८ कर्मचारी काम करतात'''' असेही त्याने सांगितले.

निवृत्त पोलिस हवालदार विष्णू जोशी यांचा मुलगा रोहित जोशी यानेही व्यवसायालाच प्राधान्य दिले. प्रारंभी वडापाव, भाजीपाला विक्री, घरोघरी वृत्तपत्रे टाकण्यापासून झालेल्या सुरुवातीनंतर त्यांनी भावासमवेत मेडिकल सुरू केले. तो व्यवसाय बंद झाल्यानंतर ‘श्रीराम डिस्ट्रिब्युटर्स या नावाने औषधे पुरवठा क्षेत्रात काम सुरू केले. त्यानंतर रोहितने श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली. त्याद्वारे पोलिसांच्या मुलांना कर्ज देऊन व्यवसायात आणले. ४ ते ५ मेडीकल दुकानेही आहेत. रोहित सांगतो "आता माझ्या संस्थेची पुणे, बंगळुरु, औरंगाबाद, सातारा येथे कार्यालये असून कोट्यवधी रुपयांची उलाढाल आहे. माझे ८५ कर्मचारी आहेत. सध्या केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रीकचा संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत आहे.''''

स्वारगेट पोलिस वसाहतीमध्ये वाढलेल्या स्वप्नील घायाळ यांचे वडील सुधीर घायाळ हे सहायक पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. घायाळ यांनी सुरुवातीला सेल्समन म्हणून काम केले. त्यानंतर स्वतःची ‘संकल्प को ऑपरेटीव्ह’ नावाची पतसंस्था सुरू केली. त्यांच्याकडे सध्या ७ मुले कामाला आहेत. स्वतः स्थिरस्थावर होऊन इतरांच्या हाताला काम देण्याचे वेगळेच समाधान वाटते, असे स्वप्नील सांगतो.

फोटो नं - स्वप्नील वैद्य - ८५५३८, रोहित जोशी -८५५४०, स्वप्नील घायाळ -८५५४३ , विकास जामदार - ८५५६०

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91611 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..