पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कलावंताचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कलावंताचा सन्मान
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कलावंताचा सन्मान

पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कलावंताचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ‘‘नाटकातील प्रत्येक पात्रांमध्ये सत्व, रज, तम हे तीन गुण असतात. नाटक हे समतल कधीच असू शकत नाही, नाटक म्हणजे भावभावनांचा कल्लोळ आहे. सत्व, रज आणि तमचा अविष्कार म्हणजे नाटकातली पात्रे. समाजाला एकत्रित ठेवून त्यांचे मनोरंजन आणि प्रबोधन नाटकाच्या माध्यमातून होते,’’ असे मत संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते डॉ. राम साठ्ये यांनी व्यक्त केले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

पुणे मराठी ग्रंथालयाच्या वतीने नाट्य कलावंतांसाठी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. साठ्ये यांच्या अध्यक्षतेखाली विविध पुरस्कार देण्यात आले. अभिनेते रवींद्र खरे, पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष श्रीकांत देव, कार्यवाह सुधीर इनामदार, सहकार्यवाह विद्युत पावगी, मंगेश अनगळ या वेळी उपस्थित होते. या वेळी डॉ. राम साठ्ये यांना कृष्णराव गोखले पुरस्कार, तर अनुष्का आपटे यांना नरहरबुवा पाटणकर पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. संजय लोळगे (अहमदनगर), सुधीर फडतरे (पुणे), निधी घारे (पुणे) हे हरी गणेश फडके पारितोषिकाचे मानकरी ठरले. डॉ. साठ्ये म्हणाले की, अविट गोडीची गाणी ही संगीत नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. संगीत नाटके दोनशे वर्षांपासून टिकून आहेत आणि पुढील दोन हजार वर्षेही टिकून राहतील. खरे म्हणाले, ‘‘नाटक चालू ठेवणे म्हणजे परंपरा टिकून ठेवणे. परंपरा सुरू ठेवताना ती सक्षम आणि सुदृढ असायला हवी आणि त्यात सतत नावीन्य आणायला हवे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91640 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..