यिनचा आठवा वर्धापनदिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिनचा आठवा वर्धापनदिन उत्साहात
यिनचा आठवा वर्धापनदिन उत्साहात

यिनचा आठवा वर्धापनदिन उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १९ ः ‘यिन’चा आठवा वर्धापनदिन सकाळ कार्यालयात तरुणाईच्या जल्लोषात शुक्रवारी साजरा झाला. यानिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.
शहरातील जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर झाले. यावेळी यिनच्या स्थापनेपासून असणारे आजी व माजी यिनच्या सदस्यांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यिनच्या व्यासपीठाच्या माध्यमातून गेली आठ वर्षे महाराष्ट्रातील हजारो महाविद्यालयीन तरुणांना नेतृत्व विकास व सामाजिक चळवळ याचे मार्गदर्शन लाभत आहे. यिनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ व सिनेअभिनेते अजय पुरकर हे आवर्जून उपस्थित होते आणि त्यांनी तरुणाईला प्रोत्साहन दिले.
यिनच्या केंद्रीय कॅबिनेट समितीमध्ये आणि शिबिरानंतर वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या यिनच्या सदस्यांचा यावेळी पूरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या प्रसंगी पुरकर व यिन सदस्यांच्या हस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा झाला. या प्रसंगी पुण्यातील ‘आरंभ वाद्य पथका’कडून ढोल ताशा वादनाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे व पिंपरी चिंचवड यिन टीमने केले.

तरुणाईला घडवण्याच्या दृष्टीने ‘यिन’ची स्थापना करण्यात आली यातून भविष्यात नक्कीच तरुणाईला योग्य दिशा मिळू शकते. यिनच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त मी या तरुणाईला शुभेच्छा देतो.
- अजय पुरकर, अभिनता

महाविद्यालयीन तरुणाईला नेतृत्व विकास व सामाजिक जाणीव शिकवणारे ‘यिन’ हे व्यासपीठ नवव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. यिनच्या वतीने आणि तरुणाईला अभिप्रेत असणारे उपक्रम भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणात होवोत, यासाठी शुभेच्छा.
- मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, पुणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91655 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..