स्तनपानाबाबत जागरूकता हा महत्त्वाचा पैलू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्तनपानाबाबत जागरूकता हा महत्त्वाचा पैलू
स्तनपानाबाबत जागरूकता हा महत्त्वाचा पैलू

स्तनपानाबाबत जागरूकता हा महत्त्वाचा पैलू

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : ‘‘स्तनपान आणि स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू आहे. बाळाचा जन्म होताच त्याला स्तनपान केले पाहिजे. त्यामुळे बाळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते,’’ असे मत शहरातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुणे ऑबस्ट्रेटिक ॲण्ड गायनोकॉलॉजीकल सोसायटीतर्फे ‘ब्रेस्टकॉन २०२२’ या परिषदेचे उद्‍घाटन झाले. त्यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञांनी हा सल्ला दिला. बाळाला केलेल्या स्तनपानामुळे मातेसाठी रक्तस्राव आणि अशक्तपणा तसेच स्तनाचा कर्करोग, लठ्ठपणा यांसारख्या समस्या कमी होऊन तिचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रेटिक ॲण्ड गायनोकॉलॉजीकल सोसायटीज् ऑफ इंडिया’चे (एफओजीएसआय) माजी अध्यक्ष डॉ. पी. के. शाह आणि नियोजित अध्यक्ष डॉ. जयदीप टांक यात सहभागी झाले होते. ‘पीओजीएस’चे अध्यक्ष डॉ. पराग बिनीवाले, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद दुगड, डॉ. उमा वानखेडे, सचिव डॉ. आशिष काळे आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. शाह म्हणाले, ‘‘गर्भवतीची सर्वप्रथम तपासणी स्त्रीरोग तज्ज्ञ करतात. त्यावेळेपासूनच स्तनपानाची खरी जाहिरात सुरू होते. मात्र, काही स्त्रीरोग तज्ज्ञ स्तनपानाबाबत जागरूकता आवश्यक मानत नाहीत. त्यामुळे यासंदर्भातील आकडेवारी आपल्याकडे समाविष्ट केली जात नाही.’’ डॉ. बिनीवाले म्हणाले, ‘‘जगभरात केवळ ४०-५०% स्त्रिया जन्मानंतर लगेचच स्तनपान सुरू करतात. आईकडे दुधाचे प्रमाण कमी असेल तर बाळाला फॉर्म्युला फीड देण्यापेक्षा पूरक आहार आणि औषधे आईला दिली जाऊ शकतात.’’ तर डॉ. वाणी म्हणाल्या, ‘‘स्तनाच्या कर्करोगाच्या घटना कमी करण्यासाठी लवकर निदान होणे आवश्यक असते. त्यासाठी जनजागृतीची गरज आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91682 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..