दादा कोंडके यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादा कोंडके यांना अभिवादन
दादा कोंडके यांना अभिवादन

दादा कोंडके यांना अभिवादन

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, दिग्गज अभिनेते शाहीर दादा कोंडके यांचा ९१ वा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. दादा कोंडके यांचा जन्म मुंबई येथे १९३२ साली श्रावण कृष्णपक्ष श्रीकृष्ण जन्माष्टमीला झाला. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ते हयात असताना श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशी रात्री बारा वाजता साजरा होत होता. १४ मार्च १९९८ मध्ये दादा त्यांचा मृत्यूनंतर गेल्या २४ वर्षांपासून दरवर्षी याच दिवशी जयंती साजरी केली जाते.

शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान, दादा कोंडके मित्र परिवार आणि दादा कोंडके ग्रुप प्रॉडक्शन्सतर्फे हा उपक्रम राबविण्यात येतो. या निमित्ताने दादा कोंडके यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामोपाध्याय सुरेश काळे यांच्या हस्ते करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे सल्लागार विक्रम जाधव, फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे संचालक जितेंद्र गोळे, शिवांशशक्ती फाउंडेशनचे सूरज सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र भवाळकर, उद्योजक बाळासाहेब दुर्गे, अंकुश ढवळे, लेखक सतीश काळे, अभिनेते प्रशांत महाजन, दिग्दर्शक अर्पित इंगळे, प्रफुल्ल धर्माधिकारी, अमित माझीरे, विजय उत्तेकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91697 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..