कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप
कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप

कोंडीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये दहीहंडी उत्सवामुळे रस्ते बंद असल्याने प्रमुख रस्त्यांवर शुक्रवारी सायंकाळपासून वाहतूक कोंडी झाली होती. अर्धा ते एक तासाहून अधिक काळ वाहतूक कोंडीमध्ये अडकल्याने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, नवी पेठेतील लाल बहादूर शास्त्री रस्ता, सिंहगड रस्ता या ठिकाणांसह शहरातील उपनगरांमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता व बाजीराव रस्त्यावर येणारी वाहतूक सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद केली होती. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, लाल बहादूर शस्त्री रस्ता, सिंहगड रस्ता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. अर्धा ते एक तासाहून जास्त वेळ नागरिक कोंडीत अडकून पडले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. पोलिस ठाणे व वाहतूक पोलिस रस्त्यांवर असले तरीही वाहतूक नियमनाचा अभाव ठिकठिकाणी दिसत होता.

अस्ताव्यस्त वाहनांमुळे मार्ग बंद
वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरीकेडस्‌ लावून रस्ते बंद केल्याने मध्यवर्ती भागातून बाहेर जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना अक्षरशः कसरत करावी लागली. तर काही ठिकाणी मंडळांनी स्वतःच रस्ते बंद केल्याने नागरिकांवर त्यांच्या घरी जाण्यासाठीही अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र होते. याबरोबरच मध्यवर्ती भागात काही मंडळांच्या दहीहंडी रस्त्यांवरच असल्याने तेथूनही वाट काढताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तर बंद रस्ते, रस्त्यावरील गर्दी, अस्ताव्यस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांमुळे नागरिकांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे नागरीकांना दोन ते तीन तास बसून राहण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचेही चित्र दिसून आले.


क्‍लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी निघाले, मात्र जाताना ठिकठिकाणी रस्ते बंद होते. दुचाकी वाहने रस्त्यांवर आडवी लावण्यात आली होती. त्यामुळे दुचाकीला वाट मिळत नसल्यामुळे एक ते दीड तास दुचाकीवरून फिरावे लागले.''''
- कावेरी वाघ, विद्यार्थिनी

85649

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d91773 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..