शिव स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावणे हीच खरी श्रद्धांजली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिव स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावणे हीच खरी श्रद्धांजली!
शिव स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावणे हीच खरी श्रद्धांजली!

शिव स्मारकाचा प्रश्‍न मार्गी लावणे हीच खरी श्रद्धांजली!

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः आमचा नेता गेला आहे. अपघात झाल्यावर त्यांना लवकर मदत मिळावी, अशी आमची भावना होती. शिवसंग्राम संघटनेने जे प्रश्न हाती घेतले होते, त्या प्रश्नांची जबाबदारी आता आमच्या खांद्यावर आहे. मराठा आरक्षण, शिव स्मारकासारखे प्रश्न मार्गे लागले, तर हीच खरी श्रद्धांजली शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार विनायक मेटे यांना ठरू शकेल, अशी भावना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

शिंदे म्हणाले, ‘‘शिवसंग्रामच्या वतीने विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी आमचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री आणि भाजपकडे करणार आहे. तसेच सध्या दुखवटा आहे, दुखवटा संपला की, राज्य कार्यकारणीची बैठक बोलावून संघटनेची पुढची दिशा ठरवली जाईल.’’ २४ ऑगस्ट रोजी मुंबईत आदरांजली सभा आयोजित केली आहे, असेही शिंदे यांनी सांगितले. मेटे यांच्या अपघाताची चौकशी निपक्षपातीपणे व्हावी, अशी मागणी करत त्यांचा घातपात म्हणायला आमच्याकडे कुठले ही पुरावे नाहीत. बाळासाहेब चव्हाण हा मेटे यांचा भाचा किंवा कोणी नातेवाईक नाही. मेटे यांच्या चालकावर आरोप केले ही त्याची भावना असू शकते. त्याला कुठलीही परवानगी संघटनेकडून नव्हती, असेही ते म्हणाले. या वेळी संघटनेचे विक्रांत आंब्रे, शेखर पवार, कल्याण अडागळे, तुषार काकडे आदी उपस्थित होते.