‘बार्टी’मार्फत अधिछात्रवृतीसाठी करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बार्टी’मार्फत अधिछात्रवृतीसाठी करा अर्ज
‘बार्टी’मार्फत अधिछात्रवृतीसाठी करा अर्ज

‘बार्टी’मार्फत अधिछात्रवृतीसाठी करा अर्ज

sakal_logo
By

पुणे, ता. २० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) एम. फिल आणि पीएच. डी. करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती’साठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांनी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन ‘बार्टी’ने केले आहे.

या अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी अनुसूचित जातीतील आणि महाराष्ट्रातील रहिवासी असावा. एम. फिल, पीएच.डी.साठी १ जून २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कायमस्वरूपी नोंदणी असावी. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामध्ये पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांनादेखील ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या अधिछात्रवृत्तीसाठी २५ ऑगस्टपासून ‘https://barti.maharashtra.gov.in’ संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह भरलेल्या अर्जाची प्रत बार्टी, २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे या पत्त्यावर ३० सप्टेंबरपर्यंत पाठवावी किंवा प्रत्यक्ष येऊन सादर करावी. याबाबत परिपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्त्वे, सूचना बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती ‘बार्टी’च्या योजना विभागाचे उमेश सोनावणे यांनी दिली.