इग्नूचा प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इग्नूचा प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम
इग्नूचा प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम

इग्नूचा प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे. समर्थ पोर्टलच्या माध्यमातून हा सहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम प्राध्यापकांना घेता येईल, अशी माहिती विभागीय संचालक डॉ. डी.आर. शर्मा यांनी दिली.

देशातील शैक्षणिक धोरणात अनेक नवे बदल होऊ घातले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने नवीन शैक्षणिक धोरणाची रचना, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, समानता, उच्च शिक्षणातील आधुनिक अध्यापन शैली आदी विषयांवर या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येईल. विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी असलेले सर्व विद्यापीठे, खासगी उच्चशिक्षण संस्था, तंत्रशिक्षण संस्थांतील प्राध्यापक यात सहभाग नोंदवू शकता. डॉ. शर्मा म्हणतात की, महाराष्ट्रातील सर्व प्राध्यापकांना मी या विकास कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करतो. येऊ घातलेल्या नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वपूर्ण बदलांचा आवाका याद्वारे प्राध्यापकांना येईल.’’

महत्त्वाच्या बाबी ः
- राष्ट्रीय स्तरावरील ३६ तासांचा प्राध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम
- जास्तीत जास्त नऊ दिवसांत अभ्यासक्रम पूर्ण करता येणार
- समर्थ या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नोंदणी
- संकेतस्थळ https://ignou-nep-pdp.samarth.ac.in/