राज्यसेवा पूर्व परीक्षा आज होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसेवा पूर्व परीक्षा आज होणार
राज्यसेवा पूर्व परीक्षा आज होणार

राज्यसेवा पूर्व परीक्षा आज होणार

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणारी ‘राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२’ ही परीक्षा रविवारी (ता. २१) राज्यातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. राज्यातील एक लाख ९५ हजार विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावरील परीक्षा कक्षामध्ये सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे ‘एमपीएससी’चे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर यांनी सांगितले.
एमपीएससीने ११ मे रोजी राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२२ ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात १६१ पदांचा समावेश होता. केवळ १६१ पदेच असल्याने स्पर्धा परीक्षार्थींनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र, आता गट ‘अ’ आणि गट ‘ब’ संवर्गाची मिळून ३४० पदे वाढल्याने ५०१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
परीक्षेदरम्यान झालेल्या सामुहिक कॉपी प्रकरणाची तपासणी सुरु आहेत तर मागील परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एमपीएससीने परीक्षेदरम्यान कडक धोरण राबविल्याने उमेदवारांना काळजी घ्यावी लागणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचे यापूर्वीच एमपीएससीने जाहीर केले आहे.

उपजिल्हाधिकारी गट अ संवर्गाची ३३, पोलिस उपअधीक्षक गट अ संवर्गाची ४१, सहायक राज्यकर आयुक्त गट अ संवर्गाची ४७, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गट अ संवर्गाची १४, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ संवर्गाची दोन, शिक्षणाधिकारी गट अ संवर्गाची २०, प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) गट अ संवर्गाची सहा, तहसीलदार गट अ संवर्गाची २५, सहायक गट विकास अधिकारी गट ब संवर्गाची ८०, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब संवर्गाची तीन, सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब संवर्गाची दोन, उपशिक्षणाधिकारी गट ब संवर्गाची २५, सहायक प्रकल्प अधिकारी गट ब संवर्गाच्या ४२ पदांचा यात समावेश केला आहे.