ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : पाटील
ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : पाटील

ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध : पाटील

sakal_logo
By

पुणे, ता. २० : ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, आगामी काळात समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी अमृत महामंडळाच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध होतील, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
ब्राह्मण महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज पाटील यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले‌. या सर्व मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करत असून, अमृत महामंडळाचे कामही प्रगतिपथावर आहे, असे पाटील यांनी सांगितले.
या वेळी ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, मनोज तारे, राहुल आवटी, मयुरेश आरगडे, मदन सिन्नरकर, तृप्ती तारे, सुशील नगरकर, मिलिंद बर्वे, राजेश कुलकर्णी, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते. जो घटक आरक्षणाच्या कक्षेत येत नाही, त्या घटकासाठी नवीन महामंडळ स्थापन केले जाणार होते. त्यानुसार अमृत नावाने एक महामंडळ तयार झाले. पण सरकार गेल्याने या महामंडळाचे कामकाज बारगळले. अडीच वर्षानंतर पुन्हा आम्ही सत्तेत आलो आहोत. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.’’