अध्यापकच मुलांना मैदानावर आणू शकतील प्रकाश जावडेकर यांचे मत ः कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार-२०२२ सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यापकच मुलांना मैदानावर आणू शकतील

प्रकाश जावडेकर यांचे मत ः कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार-२०२२ सोहळा
अध्यापकच मुलांना मैदानावर आणू शकतील प्रकाश जावडेकर यांचे मत ः कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार-२०२२ सोहळा

अध्यापकच मुलांना मैदानावर आणू शकतील प्रकाश जावडेकर यांचे मत ः कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार-२०२२ सोहळा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ ः ‘‘देशी खेळांचा विसर पडत चालला आहे. आपण लहानपणी खेळलेल्या खेळांमध्ये सौंदर्य आहे. आजकालची मुले मोबाईलमध्येच खेळ खेळत आहेत. मात्र, खरे खेळणे म्हणजे मैदानावरील खेळणे आहे. त्यामुळे मुलांना मैदानावरील खेळ खेळविण्यासाठी प्राध्यापकांनी आणि अध्यापकांनी पुढाकार घेयाला हवा. तेच मुलांना मैदानावर आणू शकतील.’’ असे मत माजी केंद्रीय मंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र मंडळ आयोजित कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार-२०२२ सोहळ्यात जावडेकर बोलत होते. त्यांच्या हस्ते ॲथलेटिक्स मार्गदर्शक गुरुबन्स कौर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू संजीव सोनवणे, माजी पोलिस आयुक्त श्रीकांत बापट, महाराष्ट्र मंडळचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, रोहन दामले आदी उपस्थित होते.

जावडेकर म्हणाले, ‘‘राज्यात पहिल्यापासून कुस्ती खेळाचे प्रशिक्षण मिळत आहे. तेवढ्या प्रमाणात इतर खेळांना मिळाले नसले तरी आता शास्त्रीय प्रशिक्षण मिळायला सुरुवात झाली आहे. कबड्डी लीग प्रमाणे पुण्यात खो-खो या खेळाची लीग सुरू आहे. हा खेळ देखील देशभर चांगला गाजेल याची खात्री आहे.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोर खेळावर आहे. खेळाची संस्कृती देशात रुजली पाहिजे. त्यासाठी देशाने खेळले पाहिजे. त्यासाठीच ‘खेलो इंडिया’ आहे. याचा परिणाम आता स्पर्धांमध्ये दिसत आहे. खेळाडू सुवर्ण पदक मिळवत आहेत. त्यामागे त्या खेळाडूची तपश्चर्या आणि देशाचे पाठबळ असते. जगभर खेळण्यासाठी सर्व खर्च सरकार करत आहे. तसेच खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जात आहे. हे देशाचे नवीन धोरण आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.

‘‘खेळ आणि खेळाडू यांच्यासोबत गेल्या ५८ वर्षांपासून जोडले गेले आहे. खेळाडू घडण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.’’
- गुरुबन्स कौर, ॲथलेटिक्स मार्गदर्शक, पुरस्कारार्थी

फोटो - 08437

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92108 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..