गीतायोग 23 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गीतायोग 23 ऑगस्ट 2022
गीतायोग 23 ऑगस्ट 2022

गीतायोग 23 ऑगस्ट 2022

sakal_logo
By

दैनिक सकाळ
श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे,
आत्मसंतुलन व्हिलेज,
कार्ला ४१० ४०५

अध्याय ११ श्र्लोक ३९ डी
परमेश्र्वराची स्तुती आणि वारंवार नमस्कार
वायुर्यमोऽग्निर्वरुणः शशाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्र्च ।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः पुनश्र्च भूयोऽपि नमो नमस्ते ॥३९॥
आपणच वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्रमा, ब्रह्मा, ब्रह्मदेवाचेही पिता आहात. आपणाला सहस्रशः नमस्कार असोत. आपणाला आणखीही वारंवार नमस्कार असोत.
संसाराने त्रस्त होणे, सतत दुःखी असणे हा सर्वांत मोठा रोग. दुखावलेल्याला नको हा संसार, असे वाटायला लागते. भवरोगाने आतली सगळी सिस्टिम बिघडून जाते. अन्न पचत नाही, शक्ती येत नाही, अग्नी कमी होतो पर्यायाने देवत्व कमी होते. भवरोगावरचा एकमेव इलाज यज्ञ. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी म्हटलेले आहे, तापत्रयाने मम देह तापला म्हणजे भगवंतांना शरण गेल्याशिवाय तापत्रयावर कोणताही उपाय नाही. परमेश्र्वरापर्यंत जाण्यासाठी थेरपी आहे यज्ञ.
तुम्हीच वरुण आहात. वरुण म्हणजे आकाश. महा-ईश म्हणजे महेश तो तोच. हे देवाधिदेवा आपणच सर्व काही आहात. आपण नसला तर हे ब्रह्मांडच निर्माण होऊ शकणार नाही. म्हणून हे देवा, आपल्याला वारंवार नमस्कार असो.
पुरुषसूक्तात पुरुषापासून जी ब्रह्मांडाची उत्पत्ती सांगितली आहे, तीच गीतेतही भगवंतांनी सांगितलेली दिसते. वेद-उपनिषदांचे सार आहे गीता. त्यामुळे पुरुषसूक्तात जे सांगितले आहे, तेच गीतेतही दिसले तर नवल नाही. वेदकालीन देवतांमध्ये अग्नीला महत्त्व आहे. अग्नीची दोन रूपे. पहिले नैसर्गिक रूप, दुसरे मानवनिर्मित रूप. नैसर्गिक अग्नीचा ज्वालारूपी रथ आहे. सोन्याचा रथ आहे. विद्युतरूपी आहे. तरंग, घृतस्रावी असे त्याचे स्वरूप आहे. मानवी शरीरातही दोन अग्नी असतात. हार्मोन्स सिस्टिम हा अग्नीच आहे..
दुसरा अग्नी अरणीतून जन्म घेतलेला आहे. पृथ्वी व आकाश यांच्यातून जन्मलेला असा तो आहे. तो देवांचा पुत्र आहे. पुरांचा हित करणारा, ब्रह्मांडाचे हित करणारा म्हणून पुरोहित आहे. मनुष्याचे पालकत्व असल्यासारखा तो आहे. तो अमर आहे, जरारहित आहे. आपल्याला ऐहिक सुखे त्यांने मिळवून द्यावी अशी प्रार्थना करतो. राम-सुग्रीव भेटीच्या वेळी हनुमानाने हा अग्नी निर्माण केलेला आहे. त्याच्या भोवती प्रदक्षिणा करून त्या दोघांची मैत्री दृढ झाली.
भारतीयांनी अनादी कालापासून अग्निदेवता ही मोठी देवता मानली. यज्ञसंस्थेत अग्नीच प्रधान आहे. तेजोमय अशा अग्नीची उपासना करण्यासाठी भारतीयांनी सूर्याची, दिव्याची, प्रकाशाची उपासनाही केली आहे.
‘चंद्रमा मनसो जातः’ मनापासून चंद्र उत्पन्न झाला आहे. समुद्राची भरती-ओहोटी ही चंद्रावर अवलंबून असते. तो सोम आहे. परमपुरुषापासूनच निर्माण झालेल्या वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्रमा या सगळ्या गोष्टी आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92289 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..