कचरावेचक तरुणाचा गोळ्या घालून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कचरावेचक तरुणाचा गोळ्या घालून खून
कचरावेचक तरुणाचा गोळ्या घालून खून

कचरावेचक तरुणाचा गोळ्या घालून खून

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : कचरा वेचण्यासाठी गेलेल्या तरुणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळी झाडुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चंदननगर परिसरातील दुर्गामाता मंदिर येथे घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अक्षय प्रकाश भिसे (वय २५, रा. पठारे वस्ती, चंदन नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भिसे हा तरुण कचरा वेचण्याचे काम करतो. रविवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे सकाळी कचरा वेचण्यासाठी गेला होता. पायी चालत तो दुर्गामाता मंदिराच्या पाठीमागील बाजुस असलेल्या पठारे वस्तीत आला. त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या दोघांनी त्यास एका गल्लीत गाठले. त्याच्यावर पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी त्यास उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविला. दरम्यान पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहे, तसेच तपास पथके आरोपींच्या मागावर पाठविण्यात आली आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92300 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..