यादव यांच्याकडून ईएसआयसी रुग्णालयाचा आढावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यादव यांच्याकडून ईएसआयसी रुग्णालयाचा आढावा
यादव यांच्याकडून ईएसआयसी रुग्णालयाचा आढावा

यादव यांच्याकडून ईएसआयसी रुग्णालयाचा आढावा

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : बिबवेवाडीच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी आढावा घेतला. येथील १६ एकर जागेवर ५०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे.
या वेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आदी उपस्थित होते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या मागणीवरून यादव यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

या वर्षअखेरपर्यंत आवश्यक परवानग्या आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार असून, जून २०२५ पर्यंत टप्प्याटप्याने काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. सर्व वैद्यकीय सोयींनीयुक्त सात मजल्याच्या इमारतीत सुमारे साठ हजार चौरस फूट बांधकाम होणार आहे, अशी माहिती केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे उदयकुमार चोगले आणि ईएसआयसीचे बिनय काकडे यांनी दिली.

या वेळी आमदार मिसाळ म्हणाल्या, ‘‘पर्वती विधानसभा मतदारसंघात एकही शासकीय रुग्णालय नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होते. बिबवेवाडी येथील ईएसआयसीच्या नऊ एकर जागेवर ससूनच्या धर्तीवर रुग्णालय व्हावे, यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92301 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..