गानवर्धनच्या महोत्सवाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गानवर्धनच्या महोत्सवाला
प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
गानवर्धनच्या महोत्सवाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

गानवर्धनच्या महोत्सवाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

sakal_logo
By

पुणे ः गानवर्धन आणि एनसीपीए-मुंबई यांच्यातर्फे प्रथमच आयोजित संगीत महोत्सवातील पहिल्या सभेत उस्ताद झुनैन खान यांचे बहारदार सतार वादन झाले, त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. खान यांनी राग भीमपलास वाजवला. त्यानंतर पंडित प्रवीण शेवलीकर यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांनी राग मियामल्हार आणि पहाडी मिश्र धून सादर केली. या कलाकारांना अनुक्रमे भरत कामत आणि समीर सूर्यवंशी यांनी तबलासाथ केली. चैताली शेवलीकरने व्हायोलिनसाठी सहवादन केले. प्रमुख पाहुणे व ज्येष्ठ व्हायोलिनवादक उस्ताद फैय्याज हुसेन यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला. यावेळी संस्थेचे कार्यवाह रवींद्र दुर्वे, अध्यक्ष दयानंद घोटकर, लिज्जत पापडचे अध्यक्ष सुरेश कोते, रमेश बापट उपस्थित होते. डॉ. नीलिमा राडकर यांनी निवेदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92468 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..