‘अंदाज’ नृत्य महोत्सवाचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंदाज’ नृत्य महोत्सवाचे उद्‍घाटन
‘अंदाज’ नृत्य महोत्सवाचे उद्‍घाटन

‘अंदाज’ नृत्य महोत्सवाचे उद्‍घाटन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः कथक नृत्यातील विविध घराण्यांची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या बंदिशी, तिहाई, तोडे, परण, कजरी असे कथक नृत्यातील पदरचनांचे वैविध्यपूर्ण आविष्कार रसिकांना पाहायला मिळाले. निमित्त होते ‘अंदाज’ या शास्त्रीय नृत्य महोत्सवाच्या उद्‍घाटनाचे.

पश्चिम क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी यांच्यातर्फे आणि ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका किरण सोनी गुप्ता यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले. याप्रसंगी डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटीचे प्रमुख पं. नंदकिशोर कपोते, ज्येष्ठ नर्तक पुरू दधीच, विदुषी नंदिता पुरी, विदुषी जयंती माला, रामलाल बरेठ आदी उपस्थित होते.

महोत्सवाच्या प्रारंभी पं. कपोते यांनी कथक नृत्यातील मंदिर परंपरेचा आविष्कार सादर केला. त्यानंतर पुरी यांनी दुर्गा स्तुती सादर करून तीन तालात पारंपरिक नृत्य आविष्काराची अनुभूती दिली. जयंती माला यांनी बारा मात्रांमध्ये शिववंदना, कजरी आणि बिजली गतनिकास सादर केली. रेणू शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92496 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..