पँथर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पँथर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
पँथर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

पँथर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः दलित पँथर सुवर्ण महोत्सव समिती पुणे शहरतर्फे पँथर पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दलित पँथर ही आंबेडकरी चळवळीतील एक क्रांतिकारक व प्रेरणादायी संघटना आहे. या लढाऊ संघटनेत योगदान दिलेल्या १२५ कार्यकर्त्यांचा व हयात नसलेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती समितीने पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील १२५ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा गुरुवारी (ता.२५) दुपारी तीन वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले असणार आहेत. अविनाश महातेकर चंद्रकांत हंडोरे, अर्जुनराव डांगळे, दिलीप जगताप, गंगाधर आंबेडकर, विजय जाधव, ॲड. जयदेव गायकवाड, जगन्नाथ गायकवाड, रोहिदास गायकवाड, सुखदेव सोनवणे आदी उपस्थित राहणार आहेत. अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त कामगार श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारण्यासाठी पॅंथरचे पुर्नजीवन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली जाणार आहे, असे या वेळी समितीने स्पष्ट केले. या वेळी समितीचे शैलेंद्र चव्हाण, दिलीप जगताप, यशवंत नडगम, अशोक शिरोळे, माऊली भोसले, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, प्रकाश साळवे, माऊली भोसले, शिलार रतनगिरी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92502 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..