वयाच्या अटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वयाच्या अटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
वयाच्या अटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

वयाच्या अटीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

sakal_logo
By

पुणे, ता. २२ ः संजय गांधी निराधार अनुदान योजनेत दरवर्षी उत्पन्नाचा दाखला काढण्याबाबत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची वयाची अट ६० वर्षे करण्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी सोमवारी विधी मंडळात दिली. आमदार सुनील कांबळे यांनी याबाबत लक्षवेधी उपस्थित केली होती.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत ७ ऑगस्ट २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यात विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्या निर्णयामध्ये लाभार्थ्यांकडून दरवर्षी एप्रिल ते जून दरम्यान उत्पन्नाचा दाखला घेणे सक्तीचे असेल, असे म्हटले असून ते न मिळाल्यास अर्थसहाय्य बंद करावे, असेही नमूद केले आहे. या अटीमुळे विधवा महिला, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला काढणे अत्यंत अवघड झालेले आहे. तसेच ६५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना श्रावणबाळ योजनेचा लाभ मिळतो, परंतु साठ वर्षांवरील नागरिकांनाही या योजनेच्या अनुदानाची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर श्रावण बाळ योजनेतील नागरिकांची वयाची अट ६५ वरून ६० वर्ष करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, असे कांबळे यांनी लक्षवेधीद्वारे म्हटले होते. त्याला उत्तर देताना सामाजिक न्याय खात्याचा कार्यभार असलेले राठोड यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असे आश्वासन दिले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92558 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..